top of page

“ज्ञान सरिता नित्य खळखळे | विज्ञान संस्कारे पिकती मळे"

उद्दिष्टे

आ.च. विद्यालय,मलकापूर

शिक्षणामुळे व्यक्तिमत्वाचा संपूर्ण व सर्वांगीण विकास होतो. विद्यार्थ्यांचा विविध अंगी विकास करण्यासाठी शाळेमध्ये विविध शालेय व सहशालेय उपक्रमाचे आयोजन करणे आवश्यक आहे. या उपक्रमातूनच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होते.

              विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास साधत असताना विद्यालयामध्ये विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमातून त्यांच्या अंगी असणारे सुप्त गुणांचा विकास होतो. अशा कार्यक्रमातून नेतृत्व गुण, संस्कार, निरीक्षण, सृजनशीलता, सामाजिक बांधिलकीची जाणीव, संग्राहक, श्रवणक्षमता, सेवाभावी वृत्ती, राष्ट्रीय काम, राष्ट्रभक्ती, अभिनय कौशल्य इत्यादी क्षमतांचा विकास होतो व त्यामधूनच व्यक्तिमत्व उदयास येते.

            शैक्षणिक विषयात आवश्यक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात शोधणे अपरिहार्य आहे तसेच विशिष्ट संस्कार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.शाळेमध्ये राबवले जाणारे विविध उपक्रम हीच व्यक्तिमत्वविकासाठी प्राथमिक बीजे असतात. यामधूनच विद्यार्थ्यांच्या वर्तनात परिवर्तन घडून येते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.

            विद्यार्थ्यांच्या जीवनातील शैक्षणिक काळ अत्यंत संवेदनशील व जडण घडणीस योग्य असल्यामुळे त्यांच्या सर्वांगीण अर्थात बौद्धिक, नैतिक, शारीरिक, सामाजिक, अध्यात्मिक, विकासासाठी त्यांना समर्थ, सुयोग्य व जबाबदार नागरिक घडविण्यासाठी अभ्यासोत्तर उपक्रमच अत्यंत प्रभावी माध्यम आहे. सामाजिक व नवराष्ट्रनिर्मितीच्या परिवर्तनाची धुरा शिक्षण संस्थांच्यावर सोपविण्यात आली आहे.

ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे शिक्षणविषयी विचार -

 शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते, सर्जनशीलतेने तुमच्यात प्रगल्भ विचार येतात, विचार आणि ज्ञान वाढते आणि ज्ञानाने माणूस महान बनतो.        

  डॉ. राधाकृष्ण म्हणतात "आपण एक संस्कृती घडवीत आहोत. कारखाना नाही. संस्कृतीचे मूल्य व श्रेष्ठत्व हे भौतिक समृद्धी अथवा शासकीय यंत्रणा यावर अवलंबून नसून माणसाच्या चारित्र्यावर आहे. म्हणून शिक्षकाचे प्रमुख काम हे चारित्र्य  निर्मिती आहे.अभ्यासपूर्वक कार्यक्रम हेच चारित्र्य निर्मितीचे प्रमुख व प्रभावी साधन आहे.

विद्यालयाची वैशिष्ट्ये

* भव्य, प्रशस्त व सुसज्ज इमारत, समृध्द ग्रंथालय व पुस्तक पेढी योजना.

 *दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी.* स्वतंत्र व सर्व वैज्ञानिक उपकरणासह प्रयोगशाळा.

 * ज्ञानरचनावादी अध्ययन-अध्यापन प्रणाली.* इ. १० वी, १२ वी निकालाची उत्कृष्ट पंरपरा.

 * तज्ञ व संगणक प्रशिक्षित अध्यापक वर्ग.* आद्ययावत संगणक कक्ष व इंटरनेटची सोय.

 * अध्यापनासाठी डिजीटल क्लासरुमचा वापर.* इ. १० वी साठी स्कॉलर व बॉर्डर बॅच मार्गदर्शन.

* इ. ५ वी ते १० वी सेमी इंग्रजी माध्यमाची सोय.

* खेळाचे भरपूर साहित्य व क्रीडा प्रकारानुसार नियमित सराव व मार्गदर्शन.

* शासकीय चित्रकला स्पर्धा मार्गदर्शन.*   चित्रकला प्रदर्शन.* उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण

*  राष्ट्रीय छात्र सेना( NCC ) मुले व मुलींसाठी.

* सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना व शिष्यवृत्ती व मागासवर्गीय गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना.

* पर्यावरण व निसर्ग संवर्धन इ. सामाजिक उपक्रमात सहभाग

* शैक्षणिक परिसर व निसर्ग निरीक्षण सहलींचे आयोजन. * मुलींसाठी अहिल्याबाई मोफत बस पास योजना.

* शासकीय परीक्षा - एन.टी.एस.,एन.एम.एम.एस. इ. ५ वी ते ८ वी शिष्यवृत्ती, जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा व मार्गदर्शन. इयत्ता .4 थी व 7 वी श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षा.

* गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना मोफत गणेवश व शैक्षणिक साहित्य वाटप.

* सुप्त कला गुणांच्या विकासासाठी संगीत, तबला, नृत्य, नाट्य, अभिनय प्रशिक्षणाची सोय.

* अप्रगत विद्यार्थ्यांसाठी पुरक मार्गदर्शन.* एन्.सी.सी., आर.एस.पी., स्काऊट व गाईड प्रशिक्षणाची सोय.

* इ. १२ वी NEET व JEE, CET स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.* शालेय शिस्त नियंत्रणासाठी CC TV यंत्रणा कार्यान्वीत.* रांगोळी, पुष्पगुच्छ स्पर्धा व मार्गदर्शन.* अभ्यासपूरक उपक्रमाव्दारे विविध स्पर्धांचे मार्गदर्शन.

* निबंध, वक्तृत्व, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा व मार्गदर्शन.* वर्षातून २ वेळा विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी

* संस्थेच्यावतीने गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच गुणवंत शिक्षकांचा सत्कार.

* दिव्यांग विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना* राष्ट्रीय महामार्ग ओलांडण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत

* व्यवसाय मार्गदर्शन अंतर्गत मानसशास्त्रीय कसोटीव्दारा शैक्षणिक मार्गदर्शन

* शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रदर्शन.* ऑनलाइन शिक्षणप्रणालीचा प्रभावीवापर.

Colorful Rectangle Blocks

मुख्याध्यापक संदेश

01 Kumbhar Aruna Shivaji_edited.png

सौ.अरुणा शिवाजी कुंभार
(M.A.B.Ed,DSM)

Colorful Rectangle Blocks

सध्या सर्वच ठिकाणी स्पर्धा निर्माण झालेली आहे.त्यात पहिल्यांदा विद्यालय, विद्यालयाचा विद्यार्थी  त्या स्पर्धेत कितपत यशस्वी होतो याच्यावरती शाळा, संस्था नावारूपास येत असते. यामध्ये आमचे शिक्षक, विद्यार्थी हे स्पर्धेत पहिल्या क्रमांकावरच आहेत हे आम्ही आज आवर्जून व आत्मविश्वासपूर्वक सांगू इच्छितो. त्याचे कारणच असे की, आमचा विद्यार्थी आज अनेक क्षेत्रांमध्ये चमकताना दिसतो. आमच्या विद्यार्थ्यांनी आज अनेक क्षेत्रे पदाकांत केलेली आहेत,अनेकविध अशा पदांवरती ते कार्यरत आहेत, देशात परदेशातही. त्याचे सर्व श्रेय संस्था,शाळा,शिक्षक,पालक, विद्यार्थी या सर्वांना जाते. 

                       स्पर्धेच्या युगामध्ये शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. त्याचबरोबर चिकाटी सचोटी, नम्रता ,निर्णयक्षमता निर्भयता अशा अनेक गुणांनी परिपूर्ण असे व्यक्तिमत्व घडविणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे म्हणून मुलींच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचे बहुरंगी घटक प्रकट करण्याची संधी या शाळेमध्ये विविध उपक्रमातून विद्यार्थिंनींना उपलब्ध करून दिली जाते . मुलींच्या शाळेमध्ये मुली मोकळेपणाने वावरू शकतात ,व्यक्त होऊ शकतात असा आमचा अनेक वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे आज या शाळेतील विद्यार्थिंनी वेगवेगळ्या क्षेत्रात    उच्चपदावर चमकत आहेत  त्यांनी आपल्या  कर्तृत्वाने हे  सिद्ध केले आहे .

                  या विद्यालयांमध्ये व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणारे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते म्हणूनच हे  विद्यालय एक आदर्श शैक्षणिक संकुल आहे.

Chamomile

ध्येये व उद्दिष्ट्ये

1. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व सर्वांगीण शिक्षण देणे.
2. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व नैतिक मूल्यांचा विकास करणे.
3. ज्ञान, संशोधन व नवकल्पनांद्वारे समाजाच्या प्रगतीस हातभार लावणे.
4. विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख व उद्योजकतेस प्रोत्साहन देणारे शिक्षण उपलब्ध करून देणे.
5. राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही व सामाजिक बांधिलकी यांची जाणीव करून देणे.
6. क्रीडा, कला व सांस्कृतिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे.
7. स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण संवर्धन व सामाजिक जबाबदारी यांचा अंगीकार करणे.

विभाग प्रमुख मनोगत

मी सौ.शीला दिलीप पाटील ना.आ.च.माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मलकापूर ता.कराड येथे उच्च माध्यमिक विभागाची विभाग प्रमुख म्हणून काम करीत आहे.
कॉलेजची स्थापना २००० मध्ये झाली असून, तेव्हापासून हे कॉलेज विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत आहे. येथे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात.
 शैक्षणिक उपक्रम: इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भूगोल प्रात्यक्षिक परीक्षांचे विशेष मार्गदर्शन दिले जाते. बारावी बोर्डाच्या परीक्षेत उत्तम निकालाची परंपरा या कॉलेजने जपली आहे.
 आधुनिक तंत्रज्ञान: डिजिटल युगात विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे शिकवण्यासाठी स्मार्ट टीव्हीचा वापर केला जातो.
 खेळ आणि क्रीडा: अॅथलेटिक्स, टेबल टेनिस, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन यांसारख्या खेळांचे प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन दिले जाते.
 सुरक्षितता: विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कॉलेजमध्ये सीसीटीव्हीची व्यवस्था आहे.
 सुविधा : उच्च प्रशिक्षित शिक्षक आणि चांगल्या भौतिक सुविधा उपलब्ध आहेत.
 ग्रामीण भागातील मुला – मुलींच्या शिक्षणासाठी योगदान उच्च माध्यमिक विभागाची विभाग प्रमुख म्हणून दिलेली जबाबदारी मी समर्थपणे पेलली आहे. या विभागाचे कामकाज करताना मला संस्थेचे सचिव व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शन लाभते. प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने मी या उच्च माध्यमिक विभागाचे कामकाज योग्य प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे

सौ.पाटील एस.डी..jpg

सौ.पाटील एस.डी.

विभागप्रमुख (M.A. B.Ed. D.S.M.)

कॉलेज परिचय

Chamomile

आ.च. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व मलकापूर या कॉलेजची माहिती खालीलप्रमाणे आहे.
स्थापनाः मलकापूर व पंचक्रोशीतील १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी श्री मळाईदेवी शिक्षण
संस्थेने २००० सालापासून कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा सुरू करून मलकापूर आणि आसपासच्या
परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. 
विद्यार्थी आणि कर्मचारीः
सध्या कॉलेजमध्ये इयत्ता अकरावी व बारावी कला, वाणिज्य, विज्ञान वर्ग आहेत.कला, वाणिज्य, विज्ञान
एकूण ६ तुकड्या आहेत.जवळपास 450 विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.  
15 शिक्षक आणि 3 शिक्षकेतर कर्मचारी कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. 
शैक्षणिक कामगिरीः
ग्रामीण भागातील विद्यार्थी असूनही कॉलेजने उत्कृष्ट निकालाची परंपरा जपली आहे.ग्रामीण भागातून
येणाऱ्या विद्यार्थ्याना विविध शैक्षणिक योजनांचा लाभ दिला जातो, ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक
वाटचालीला प्रोत्साहन मिळते. 12 वीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कॉलेजची शैक्षणिक गुणवत्ता
दर्शवतात.  
इतर उपक्रमः
कॉलेजमध्ये बौद्धिक विकासासोबत क्रीडात्मक कौशल्ये आणि स्व-संरक्षणाचे धडेही दिले जातात.यामुळे
कॉलेजच्या पटसंख्येत दरवर्षी वाढ होत आहे.  
प्रशासन आणि सहकार्यः
संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ आणि संस्थेचे संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली,
कॉलेज प्रशासन, विद्यार्थी आणि पालक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे कॉलेजचीप्रगती होत आहे.

MUKHYADHYAPAK  A B THORAT_edited.png

श्री.अशोक बाबुराव थोरात
उपमुख्याध्यापक
(M.Sc.B.Ed,DSM)

Chamomile

कॉलेजची वैशिष्ट्ये

ग्रंथालय
कॉलेजचे सुसज्ज, समृद्ध व स्वतंत्र ग्रंथालय असून इयत्ता ११, १२ वीतील विद्यार्थ्यांसाठी सर्व क्रमिक पुस्तके
व त्यांच्या विषयांचे संदर्भग्रंथ उपलब्ध आहेत. ग्रंथालयात एकूण ७००० ग्रंथ असून यामध्ये कथा व
कादंबऱ्या, संदर्भग्रंथ, ललित वाड्:मय, आत्मचरित्रे, प्रवासवर्णन इत्यादी विविध पुस्तके उपलब्ध आहेत.
बसची सोय
राष्ट्रीय महामार्गाजवळ उच्च माध्यमिक विद्यालय असल्यामुळे एस. टी. बस, सर्व गाड्या मलकपूर थांबावर
थांबतात. तसेच आटके, रेठरे, वाटाणे, काले-मसूर या भागातून कराडकडे येणाऱ्या जाणाऱ्या सर्व बसेस
थांबतात.
ओळखपत्र आवश्यक
कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी ओळखपत्र सतत जवळ ठेवणे आवश्यक आहे. कॉलेजशी
संबंधीत असलेल्या कोणत्याही जबाबदार व्यक्तीने चौकशी केल्यास ओळखपत्र दाखवावे लागेल. ओळखपत्र
हरविल्यास एका आठवड्यात त्या संबंधी लेखी कळवून नवीन ओळखपत्र घ्यावे. ओळखपत्रासाठी नेहमीच्या
वेशात गांभीर्यविरहित आयडेंटीटी कार्ड आकाराचा रंगीत फोटो असावा.
गणवेश
गणवेश दररोज आवश्यक आहे. फक्त दर बुधवारी सवलत असेल.
विद्यार्थी कल्याण निधी
या निधीतून प्रतिवर्षी गरीब, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना बस पास, फॉर्म फी, शिक्षण फी इत्यादी बाबत
आर्थिक सहाय्य केले जाते.
इतर उपक्रम
उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शन, श्रमदान शिबिरे, वृक्षारोपण, अंधश्रद्धा निर्मूलन, पाककला व
रांगोळी, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, पालकसभा, वैद्यकीय तपासणी, महिला मेळावे, वृक्षारोपण, परिसर
निरीक्षण इत्यादी उपक्रम चालविले जातात. बाह्य स्पर्धा - १) भूगोल प्रश्नमंजुषा २) आर्थाजमाव गणित
स्पर्धा ३) निबंध व वक्तृत्व स्पर्धा
जिमखाना
उच्च माध्यमिक विद्यालयात भव्य क्रीडांगण असून क्रिकेट, हँडबॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल, रिंग टेनिस,
कबड्डी, खो-खो, इत्यादींची सोय करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे क्रीडागुण विचारात
घेऊन त्यांना त्या क्रीडा प्रकारातील सराव तज्ञ मार्गदर्शकांकडून करून घेतला जातो. आदर्श क्रीडा संस्था,
कराड यांच्यामार्फत वर्षभर विविध क्रीडा प्रकारांचा मोफत सराव तज्ञ उच्चांकी व विजयी सुरक्षित
खेळाडूसाठी खास प्रशिक्षण वर्ग मोफत आयोजित करून तज्ञ क्रीडा शिक्षकांकडून विविध क्रीडा प्रकारांचा
सराव करून घेतला जातो व प्रशिक्षणार्थ्यांना मोफत अल्पोपहार दिला जातो. आमच्या विद्यालयातील
खेळाडू विद्यार्थ्यांची सलग दोन वर्षे वेटलिफ्टिंग व रनिंग या खेळासाठी राष्ट्रीय पातळीवर निवड झाली
आहे.
ग्राहक भांडार
विद्यार्थ्यांना खास सवलतीतून विद्यालयाच्या ग्राहक भांडारातून शालेय स्टेशनरी, पाठ्यपुस्तके, वह्या
इत्यादी शालेय उपयोगी वस्तूंची सुविधा कॉलेज मार्फत केली जाते.
नियतकालिक
विद्यार्थ्यांच्या लेखन गुणांचा व अभ्यासवृत्तीचा योग्य आविष्कार व्हावा म्हणून चालू शैक्षणिक वर्षापासून
नियतकालिक सुरु करीत आहोत. तसेच गत वर्षापासून प्रत्येक विद्यार्थ्याला श्री मलाईदेवी शिक्षण संस्थेच्या
दिनदर्शिकेचे वाटप करण्यात येते.
श्रमदान शिबीर
दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी परिसरामध्ये विविध ठिकाणी श्रमदान शिबीरे आयोजित केली जातात.
संस्कारक्षम विद्यार्थी घडविले जातात.
विविध स्पर्धा व सहली
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध स्पर्धा घेतल्या जातात. विविध कलांचा आविष्कार
करण्याची संधी दिली जाते. प्राध्यापकांसमवेत विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास सहली आयोजित
केल्या जातात.

विद्यार्थी दत्तक योजना

विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास
घडविण्यासाठी गुणवत्ता कमी पडणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षक दत्तक घेतात व त्याची गुणवत्ता वाढविण्याचा
प्रयत्न केला जातो.
१२ वी मार्गदर्शन
१२ वी तील विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे इतर तज्ञ प्राध्यापक व प्राचार्य यांचे मार्गदर्शन.

bottom of page