Location
Email Id
Contact No.

“ज्ञान सरिता नित्य खळखळे | विज्ञान संस्कारे पिकती मळे"
उद्दिष्टे
आ.च. विद्यालय,मलकापूर
शिक्षणामुळे व्यक्तिमत्वाचा संपूर्ण व सर्वांगीण विकास होतो. विद्यार्थ्यांचा विविध अंगी विकास करण्यासाठी शाळेमध्ये विविध शालेय व सहशालेय उपक्रमाचे आयोजन करणे आवश्यक आहे. या उपक्रमातूनच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होते.
विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास साधत असताना विद्यालयामध्ये विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमातून त्यांच्या अंगी असणारे सुप्त गुणांचा विकास होतो. अशा कार्यक्रमातून नेतृत्व गुण, संस्कार, निरीक्षण, सृजनशीलता, सामाजिक बांधिलकीची जाणीव, संग्राहक, श्रवणक्षमता, सेवाभावी वृत्ती, राष्ट्रीय काम, राष्ट्रभक्ती, अभिनय कौशल्य इत्यादी क्षमतांचा विकास होतो व त्यामधूनच व्यक्तिमत्व उदयास येते.
शैक्षणिक विषयात आवश्यक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात शोधणे अपरिहार्य आहे तसेच विशिष्ट संस्कार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.शाळेमध्ये राबवले जाणारे विविध उपक्रम हीच व्यक्तिमत्वविकासाठी प्राथमिक बीजे असतात. यामधूनच विद्यार्थ्यांच्या वर्तनात परिवर्तन घडून येते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.
विद्यार्थ्यांच्या जीवनातील शैक्षणिक काळ अत्यंत संवेदनशील व जडण घडणीस योग्य असल्यामुळे त्यांच्या सर्वांगीण अर्थात बौद्धिक, नैतिक, शारीरिक, सामाजिक, अध्यात्मिक, विकासासाठी त्यांना समर्थ, सुयोग्य व जबाबदार नागरिक घडविण्यासाठी अभ्यासोत्तर उपक्रमच अत्यंत प्रभावी माध्यम आहे. सामाजिक व नवराष्ट्रनिर्मितीच्या परिवर्तनाची धुरा शिक्षण संस्थांच्यावर सोपविण्यात आली आहे.
ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे शिक्षणविषयी विचार -
शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते, सर्जनशीलतेने तुमच्यात प्रगल्भ विचार येतात, विचार आणि ज्ञान वाढते आणि ज्ञानाने माणूस महान बनतो.
डॉ. राधाकृष्ण म्हणतात "आपण एक संस्कृती घडवीत आहोत. कारखाना नाही. संस्कृतीचे मूल्य व श्रेष्ठत्व हे भौतिक समृद्धी अथवा शासकीय यंत्रणा यावर अवलंबून नसून माणसाच्या चारित्र्यावर आहे. म्हणून शिक्षकाचे प्रमुख काम हे चारित्र्य निर्मिती आहे.अभ्यासपूर्वक कार्यक्रम हेच चारित्र्य निर्मितीचे प्रमुख व प्रभावी साधन आहे.
विद्यालयाची वैशिष्ट्ये
* भव्य, प्रशस्त व सुसज्ज इमारत, समृध्द ग्रंथालय व पुस्तक पेढी योजना.
*दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी.* स्वतंत्र व सर्व वैज्ञानिक उपकरणासह प्रयोगशाळा.
* ज्ञानरचनावादी अध्ययन-अध्यापन प्रणाली.* इ. १० वी, १२ वी निकालाची उत्कृष्ट पंरपरा.
* तज्ञ व संगणक प्रशिक्षित अध्यापक वर्ग.* आद्ययावत संगणक कक्ष व इंटरनेटची सोय.
* अध्यापनासाठी डिजीटल क्लासरुमचा वापर.* इ. १० वी साठी स्कॉलर व बॉर्डर बॅच मार्गदर्शन.
* इ. ५ वी ते १० वी सेमी इंग्रजी माध्यमाची सोय.
* खेळाचे भरपूर साहित्य व क्रीडा प्रकारानुसार नियमित सराव व मार्गदर्शन.
* शासकीय चित्रकला स्पर्धा मार्गदर्शन.* चित्रकला प्रदर्शन.* उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण
* राष्ट्रीय छात्र सेना( NCC ) मुले व मुलींसाठी.
* सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना व शिष्यवृत्ती व मागासवर्गीय गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना.
* पर्यावरण व निसर्ग संवर्धन इ. सामाजिक उपक्रमात सहभाग
* शैक्षणिक परिसर व निसर्ग निरीक्षण सहलींचे आयोजन. * मुलींसाठी अहिल्याबाई मोफत बस पास योजना.
* शासकीय परीक्षा - एन.टी.एस.,एन.एम.एम.एस. इ. ५ वी ते ८ वी शिष्यवृत्ती, जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा व मार्गदर्शन. इयत्ता .4 थी व 7 वी श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षा.
* गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना मोफत गणेवश व शैक्षणिक साहित्य वाटप.
* सुप्त कला गुणांच्या विकासासाठी संगीत, तबला, नृत्य, नाट्य, अभिनय प्रशिक्षणाची सोय.
* अप्रगत विद्यार्थ्यांसाठी पुरक मार्गदर्शन.* एन्.सी.सी., आर.एस.पी., स्काऊट व गाईड प्रशिक्षणाची सोय.
* इ. १२ वी NEET व JEE, CET स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.* शालेय शिस्त नियंत्रणासाठी CC TV यंत्रणा कार्यान्वीत.* रांगोळी, पुष्पगुच्छ स्पर्धा व मार्गदर्शन.* अभ्यासपूरक उपक्रमाव्दारे विविध स्पर्धांचे मार्गदर्शन.
* निबंध, वक्तृत्व, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा व मार्गदर्शन.* वर्षातून २ वेळा विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी
* संस्थेच्यावतीने गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच गुणवंत शिक्षकांचा सत्कार.
* दिव्यांग विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना* राष्ट्रीय महामार्ग ओलांडण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत
* व्यवसाय मार्गदर्शन अंतर्गत मानसशास्त्रीय कसोटीव्दारा शैक्षणिक मार्गदर्शन
* शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रदर्शन.* ऑनलाइन शिक्षणप्रणालीचा प्रभावीवापर.

मुख्याध्यापक संदेश

श्री. फराळे मारुती पिरगोंडा
(M.A.B.Ed,DSM)

सध्या सर्वच ठिकाणी स्पर्धा निर्माण झालेली आहे.त्यात पहिल्यांदा विद्यालय, विद्यालयाचा विद्यार्थी त्या स्पर्धेत कितपत यशस्वी होतो याच्यावरती शाळा, संस्था नावारूपास येत असते. यामध्ये आमचे शिक्षक, विद्यार्थी हे स्पर्धेत पहिल्या क्रमांकावरच आहेत हे आम्ही आज आवर्जून व आत्मविश्वासपूर्वक सांगू इच्छितो. त्याचे कारणच असे की, आमचा विद्यार्थी आज अनेक क्षेत्रांमध्ये चमकताना दिसतो. आमच्या विद्यार्थ्यांनी आज अनेक क्षेत्रे पदाकांत केलेली आहेत,अनेकविध अशा पदांवरती ते कार्यरत आहेत, देशात परदेशातही. त्याचे सर्व श्रेय संस्था,शाळा,शिक्षक,पालक, विद्यार्थी या सर्वांना जाते.
स्पर्धेच्या युगामध्ये शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. त्याचबरोबर चिकाटी सचोटी, नम्रता ,निर्णयक्षमता निर्भयता अशा अनेक गुणांनी परिपूर्ण असे व्यक्तिमत्व घडविणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे म्हणून मुलींच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचे बहुरंगी घटक प्रकट करण्याची संधी या शाळेमध्ये विविध उपक्रमातून विद्यार्थिंनींना उपलब्ध करून दिली जाते . मुलींच्या शाळेमध्ये मुली मोकळेपणाने वावरू शकतात ,व्यक्त होऊ शकतात असा आमचा अनेक वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे आज या शाळेतील विद्यार्थिंनी वेगवेगळ्या क्षेत्रात उच्चपदावर चमकत आहेत त्यांनी आपल्या कर्तृत्वाने हे सिद्ध केले आहे .
या विद्यालयांमध्ये व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणारे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते म्हणूनच हे विद्यालय एक आदर्श शैक्षणिक संकुल आहे.

ध्येये व उद्दिष्ट्ये
This is a space to share more about the business: who's behind it, what it does and what this site has to offer. It's an opportunity to tell the story behind the business or describe a special service or product it offers. You can use this section to share the company history or highlight a particular feature that sets it apart from competitors.
Let the writing speak for itself. Keep a consistent tone and voice throughout the website to stay true to the brand image and give visitors a taste of the company's values and personality.
विभाग प्रमुख मनोगत
This is a space to share more about the business: who's behind it, what it does and what this site has to offer. It's an opportunity to tell the story behind the business or describe a special service or product it offers. You can use this section to share the company history or highlight a particular feature that sets it apart from competitors.

सौ.पाटील एस.डी.
विभागप्रमुख (M.A. B.Ed. D.S.M.)
कॉलेज परिचय

This is the space to introduce the business and what it has to offer. Define the qualities and values that make it unique.

श्री. पाटील जयवंत बाबुराव
उपमुख्याध्यापक
(M.A.B.Ed.B.P.Ed,)

कॉलेजची वैशिष्ट्ये
This is a space to share more about the business: who's behind it, what it does and what this site has to offer. It's an opportunity to tell the story behind the business or describe a special service or product it offers. You can use this section to share the company history or highlight a particular feature that sets it apart from competitors.
Let the writing speak for itself. Keep a consistent tone and voice throughout the website to stay true to the brand image and give visitors a taste of the company's values and personality.